परंड्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी छावा संघटनेचे कृषी उत्पन्न बाजार समितीला निवेदन; तीव्र आंदोलनाचा इशारा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा, सध्या कांदा पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी मो ठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
  • या पार्श्वभूमीवर आज परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती ये थे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यां साठी ‘छावा संघटना महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने प्रशास नाला जाहीर निवेदन देण्यात आले.
  • संघटनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख अमरभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
  • उत्पादन खर्चही निघेना; शेतकरी आर्थिक कोंडीतगेल्या काही महिन्यांत खते, बियाणे, मशागत आणि मजुरीचा खर्च कमालीचा वाढला आहे.
  • असे असताना प्रत्यक्षात बाजारपेठेत मात्र कांद्याला अत्यं त अल्प दर मिळत आहे.
  • यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असून, शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
  • शासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ विशेष अनुदान जाहीर क रावे, तसेच कांद्याला हक्काचा हमीभाव देऊन आर्थिक दि लासा द्यावा, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्या त आली.
  • अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार: अमरभाई शेखयावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना मराठवाडा संप  र्क प्रमुख अमरभाई शेख म्हणाले की, “बळीराजा आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे होरपळला आहे.
  • त्यात आता हक्काच्या पिकाला भाव मिळत नसल्याने त्याची क्रूर थट्टा होत आहे.
  • शासनाने शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नांकडे डोळेझाक न करता त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा. मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण तालुक्यात प्रशासनाविरोधात तीव्र आंदो लन छेडले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
  • पदाधिकारी व शेतकऱ्यांची मोठी उपस्थितीया निवेदन प्र संगी छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश नारायण जेधे, विधी सल्लागार ऍड. महेश चोपडे, तालुका अध्यक्ष सुधीर लटके, तालुका उपाध्यक्ष रामराजे काकडे आणि शहराध्यक्ष हरिभाऊ आदमीले उपस्थित होते.
  • तसेच माजी सरपंच पंडीत जगदाळे, सुनील सातपुते, पांडु रंग गरड, बापू धनवे, सत्यवान डांगे (कंडारी), रोहित कद म, संस्कार गरड, श्रीमंत डोके, संजय लटके, अनिल माने, नागनाथ शिंदे, परशु इंगळे, शहाजी साळुंके, अभिलाष सू र्यवंशी, बापू जगदाळे यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिका री, कार्यकर्ते आणि परंडा परिसरातील कांदा उत्पादक शे तकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles