परंडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी; बावची येथील शेतकऱ्याचे सोलर पॅनेल उडून मोठे नुकसान.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा:तालुक्यात १ जूनपासून पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लाव ली आहे.
  • दररोज संध्याकाळच्या सुमारास होणाऱ्या या मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
  • या वादळाचा मोठा फटका बावची येथील एका शेतकऱ्या ला बसला असून, त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
  • वादळी वाऱ्याचा बावची गावाला तडाखामिळालेल्या माहि तीनुसार, परंडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सात त्याने वादळी पाऊस होत आहे.
  • बुधवारी संध्याकाळी अचानक आलेल्या तीव्र वादळामुळे बावची येथील शेतकरी कानिफनाथ गोरख सरपने यांच्या शेतातील संपूर्ण सोलर ऊर्जा संच (सोलर पॅनेल) वाऱ्यामु ळे उडून गेला.
  • शेतकऱ्याचे कधीही भरून न निघणारे नुकसानवादळाचा वेग इतका प्रचंड होता की,जमिनीवर व लोखंडी सांगाड्या वर घट्ट बसवलेले सोलर पॅनेल्स हवेत उडून दूर जाऊन पडले.
  • यामध्ये संपूर्ण सोलर यंत्रणा पूर्णपणे फुटून उद्ध्वस्त झा ली आहे. विजेची अडचण दूर करण्यासाठी आणि शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने हा सोलर प्रकल्प उभारला होता.
  • मात्र, निसर्गाच्या या प्रकोपाने संपूर्ण संच निकामी झाल्या मुळे शेतकऱ्याचे कधीही भरून न निघणारे आर्थिक नुक सान झाले आहे.
  • शेतकरी पुन्हा अडचणीतआधीच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यासमोर आता या नव्या संकटा मुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
  • ऐन खरिपाच्या तोंडावर झालेल्या या अस्मानी संकटामुळे कानिनाथ सरपने यांच्यासह परिसरातील शेतकरी पूर्ण पणे अडचणीत सापडले आहेत.
  • या नुकसानीचा प्रशासनाने तात्काळ पंचनामा करावा आ णि संबंधित पीडित शेतकऱ्याला शासनाकडून भरीव आ र्थिक मदत मिळावी, अशी मागणी आता बावची येथील ग्रामस्थ आणि परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मांगनी होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles