पालखी मार्गाची उपविभागीय अधिकारी ज्योती चव्हाण यांच्याकडून पाहणी; आषाढी वारीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- आषाढी वारीच्या पार्श्वभूमी वर वारकऱ्यांचा प्रवास सुखकर,सुरक्षित आणि सुलभ व्हा वा यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे.
  • उपविभागीय अधिकारी ज्योती चव्हाण यांनी नुकतीच पा लखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या पूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला.
  • या दौऱ्यात त्यांच्यासोबत तहसीलदार काकडे, गटविकास अधिकारी गायकवाड, महसूल अधिकारी जाधव आणि ग्रामविकास अधिकारी जुल्फेकार काजी प्रामुख्याने उप स्थित होते.
  • मूलभूत सुविधांवर प्रशासनाचा भरपाहणी दरम्यान उपवि भागीय अधिकारी ज्योती चव्हाण यांनी रस्त्यांची दुरुस्ती, शुद्ध पाणीपुरवठा, तात्पुरती आरोग्य केंद्रे आणि वारकऱ्यां च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यां ना जागेवरच आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या.
  • वारीच्या मार्गात भाविकांना कोणत्याही अडचणीचा साम ना करावा लागू नये, यासाठी युद्धपातळीवर कामे पूर्ण कर ण्याचे आदेश त्यांनी दिले.
  • विठ्ठलचरणी लीन होण्यासाठी भक्तीचा महापूरआषाढी ए कादशीच्या महासोहळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक पंढरपूरकडे कूच करत आहेत.
  • आपले घरदार, शेती आणि प्रपंच बाजूला सारून केवळ विठ्ठल दर्शनाच्या ओढीने वारकरी महिनाभर पायी प्रवास करतात.
  • ऊन,वारा,पाऊस अशा कोणत्याही संकटाची पर्वा न कर ता, रात्रं-दिवस ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल’ या विठूनामाच्या गजरात संपूर्ण पालखी मार्ग दुमदुमून गेला आहे.
  • ७०० किलोमीटरचा खडतर प्रवास आणि आदरातिथ्य अ नेक पालख्या आणि वारकरी सुमारे ७०० किलोमीटर चा खडतर पायी प्रवास पूर्ण करून पंढरपूरला पोहोचतात.
  • या दीर्घ प्रवासात वारकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आ णि त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पालखी मार्गा वरील गावागावांमध्ये स्थानिक नागरिकांकडून चहापाणी, नाश्ता आणि भोजनाची चोख व्यवस्था केली जात आहे.
  • संपूर्ण महाराष्ट्रात सध्या भक्तीचे आणि आदरातिथ्याचे अ नोखे वातावरण पाहायला मिळत आहे. ७ ते ८ लाख वार कऱ्यांचे पंढरीत आगमन होणारआषाढी एकादशीपर्यंत पंढरपूर नगरीमध्ये सुमारे ७ ते ८ लाख वारकरी दाखल होण्याचा अंदाज आहे.
  • चंद्रभागेचे पवित्र स्नान आणि विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घे तल्यानंतर हा अथांग भक्तीसागर तृप्त मनाने पुन्हा आप ल्या गावी परतो.
  • या काळात पंढरपुरात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला मूल भूत सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासकीय पातळीवर चोख नियोजन करण्यात आले आहे.
  • उपविभागीय अधिकारी ज्योती चव्हाण यांनी केलेल्या या विशेष पाहणीमुळे वारी नियोजनाला मोठी गती मिळाली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles