कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना शालेय व क्रीडा साहित्य वाटप; साताऱ्यात ३० ऑगस्टला सामाजिक उपक्रम.

  • प्रतिनीधी : भारत साळुंखे :- सातारा, दि. २६ – शेतीच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतक ऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेव ण्यासाठी एक हात मदतीचा म्हणून माहिती अधिकार म हासंघ आणि लोकशासन आंदोलन पार्टी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्य, क्रीडा साहित्य आणि बूट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • हा सेवाभावी कार्यक्रम रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ रो जी दुपारी १२.३० वाजता, छत्रपती शाहू बोर्डिंग शाखा नं. १, धन्नीची बाग, मंगळवार पेठ, सातारा येथे होणार आहे.
  • कार्यक्रमाचे स्वरूप:
  • कर्ज आणि नापिकीच्या संकटात सापडून आत्महत्या केले ल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळते. अशा कुटुंबातील मुलांचे शिक्षण थांबू नये, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबव ण्यात येत आहे.
  • यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर, तसेच खेळाचे साहित्य आणि शालेय बूट वाटप करण्यात येणार आहेत.
  • मान्यवरांची उपस्थिती:
  • या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.श्री.सुभाष बसवेकर, सं स्थापक अध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, म हाराष्ट्र हे भूषवणार आहेत.
  • प्रमुख पाहुणे म्हणून माहिती अधिकाराचे ज्येष्ठ अभ्यासक मा. श्री. दिनानाथ काटकर (सर) हे मार्गदर्शन करणार आहेत.
  • प्रमुख उपस्थिती म्हणून :
  • मा.श्री.शंकर ढोले पाटील, मा.श्री.नवनाथ गबळी, मा.श्री. श्रीकांत कोळी, मा.श्री.कैलास नागणे-पाटील – युवा उद्यो जक • मा.सौ.जया छबुराव घाडगे – सहाय्यक पोलीस नि रीक्षक • मा.श्री.योगेश सुळे -जिल्हाध्यक्ष, माहिती अधिका र, सोलापूर • मा.श्री.लक्ष्मण आनवते-पाटील – मॅनेजर, हेरिटेज फूड प्रा. लि. • मा. सौ. शुभांगीताई मारुती जाधव – संस्थापक, राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय महिला संघ
    या कार्यक्रमाचे संयोजन माहिती अधिकार महासंघ यांनी केले असून, लोकशासन आंदोलन पार्टी, सोलापूरचे जि ल्हाध्यक्ष श्री.राजाभाऊ गुरुपाद दिंडोरे आणि जिल्हा का र्याध्यक्ष श्री.मारुती नारायण जाधव हे विशेष परिश्रम घेत आहेत.
  • “शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या जाण्याने त्या च्या मुलांच्या शिक्षणावर गदा येऊ नये, हा आमचा छोटा सा प्रयत्न आहे.
  • समाजानेही अशा उपक्रमात सहभागी व्हावे,” असे आवा हन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
  • या कार्यक्रमास सातारा, सोलापूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, ही आग्रहाची विनंती संयो जकांनी केली आहे.
  • स्थळ: छत्रपती शाहू बोर्डिंग शाखा नं. १, धन्नीची बाग, मं गळवार पेठ, सातारा
    वेळ: रविवार, ३० ऑगस्ट २०२६, दुपारी १२.३० वा.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles