
माहिती अधिकार कायद्याचा अवमान भोवला: वडणेर-सरणवाडीच्या ग्रामसेवकाच्या वेतनातून दंडाची रक्कम वसूल.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-माहिती अधिकार अ धिनियम २००५ अंतर्गत वेळेत माहिती न देणे वडणेर-सर णवाडी येथील तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा ग्रा मपंचायत अधिकाऱ्याला (ग्रामसेवक) चांगलेच महागात पडले आहे.

- राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यां च्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यावर दंडात्मक कार वाई करण्यात आली असून, या दंडाची रक्कम त्यांच्या वे तनातून कपात करून शासकीय कोषागारात जमा कर ण्यात आली आहे.
- याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, परंडा ता लुक्यातील वडणेर-सरणवाडी येथील रहिवासी श्री.सलीम महामुद शेख यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत विशिष्ट माहिती मागितली होती.
- परंतु, तत्कालीन जन माहिती अधिकाऱ्याने त्यांना कायद्या च्या विहित मुदतीत माहिती उपलब्ध करून दिली नाही.
- माहिती मिळण्यास टाळाटाळ झाल्याने अर्जदार सलीम शेख यांनी याविरोधात राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडे दाद मागितली होती.
- या प्रकरणाची गंभीर दखल घेत,माहिती अधिकार कायद्या चा अवमान केल्याबद्दल राज्य माहिती आयुक्तांनी संबंधि त ग्रामपंचायत अधिकाऱ्याला दंडाची शास्ती १०.०००० हजार रुपय (दंड) ठोठावली होती.
- या आदेशाच्या अनुषंगाने, परंडा पंचायत समितीचे प्रथम अपिलीय अधिकारी तथा गटविकास अधिकारी विनोद जाधव (वर्ग-१) यांनी संबंधित दोषी अधिकाऱ्याच्या वेतना तून१०.००० दंडाची रक्कम कपात केली आहे.

- शासकीय वेतनातून दंडाची रक्कम कपात केल्याची व च लनाची छायांकित प्रत (झेरॉक्स) प्रथम अपिलीय अधि काऱ्यांनी अर्जदार सलीम शेख यांना अधिकृत पत्राद्वारे (दि. १४/०८/२०२६) उपलब्ध करून दिली असून, सदर अर्ज निकाली काढण्यात आला आहे.
- या कारवाईमुळे माहिती अधिकारांतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






