
साक्री तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर; आरक्षण जाहीर होताच इच्छुकांच्या हालचालींना वेग.
- प्रतिनीधी : हर्षल ठाकरे :-साक्री तालुक्यातील अनुसूचि त क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळता इतर बिगर अनुसूचित क्षेत्रातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सन २० २५-२०३० या कालावधीकरिता आरक्षण निश्चित करण्या त आले आहे.
- मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता त हसील कार्यालय, साक्री येथे सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया पार पडली.
- साक्रीचे तहसीलदार श्री.साहेबराव सोनवणे यांच्या अध्य क्षतेखाली ही प्रक्रिया करण्यात आली.

- महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनु सार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मा गास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
- आरक्षण सोडतीपूर्वीपासूनच या प्रक्रियेकडे तालुक्यातील ग्रामस्थ, इच्छुक उमेदवार, ग्रामपंचायत सदस्य तसेच विवि ध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष लक्ष लागले होते.
- अनुसूचित जातीसाठी ३ ग्रामपंचायती
- सन २०२५-२०३० करिता अनुसूचित जातीसाठी लोणखे डी, कळंभीर आणि वसमार या ३ ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले आहे.
- अनुसूचित जमातीसाठी १२ ग्रामपंचायती
- अनुसूचित जमातीसाठी अष्टाणे, कोकले, आयणे (मळखे डे), मलांजन, निळगव्हाण, म्हसदी प्र. नेर, नागपूर (व), ना डसे, शेनपूर, अक्कलपाडा, बळसाणे आणि विटाई या १२ ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले आहे.
- नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १८ ग्रामपंचायती
- नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी कासारे, भडगाव (व), तामसवाडी, धाडणे, गणेशपूर, हट्टी बु./घाणेगाव, नांदवन/कोकले, चिंचखेडे, फोफादे, निजामपूर, वाजदरे, अंबापूर, छडवेल प., ऐचाळे, बेहेड, दुसाणे, काळगाव आणि सैयद नगर/इच्छापूर या १८ ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षि त करण्यात आले आहे.
- सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३५ ग्रामपंचायती
- सर्वसाधारण प्रवर्गासाठी भामेर,खोरी, प्रतापपूर, भाडणेगों दास, उभंड, उंभर्टी, नवडणे/सायणे, फोफरे, म्हसाळे, इंद वे, भागापूर, सातरपाडा, दातर्ती/गंगापूर, दिघावे, कावठे, वर्धाणे, हट्टी खु.,वेहेरगाव/रोजगाव, ककाणी/भडगाव, आ खाडे,महिर, शेवाळी मा.उभरांडी/होडदाणे, छाईल,शेवाळी दा., कढरे, जैताणे, खुडाणे, मालपूर, धमणार, जामदे, उंभ रे, छावडी/आमोदे, दारखेल आणि सतमाने या ३५ ग्रामपं चायतींचा समावेश आहे.
- आरक्षण जाहीर होताच राजकीय समीकरणांना वेग
- आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरपंच पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी पडणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून गावागावांत उत्सुकता होती.
- अखेर आरक्षण सोडत जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारां सह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणु कीच्या दृष्टीने तयारी सुरू करण्याची शक्यता आहे.
- विशेषतः सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पद निश्चित झा लेल्या ३५ ग्रामपंचायतींमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता असून, स्थानिक राजकीय गटांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू होण्याची चिन्हे आहेत.
- आरक्षित ग्रामपंचायतींमध्येही संबंधित प्रवर्गातील इच्छुक उमेदवार आता सक्रिय होण्याची शक्यता आहे.
- ग्रामस्थांचे लक्ष आता निवडणूक प्रक्रियेकडे
- सरपंच पदाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर साक्री तालु क्यातील ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकीचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे.
- कोणत्या गावात कोणता उमेदवार मैदानात उतरणार, को णत्या राजकीय गटाकडून कोणाला संधी मिळणार आणि स्थानिक राजकीय समीकरणे कशी बदलणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
- आरक्षण सोडतीसाठी संबंधित ग्रामपंचायतींचे नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहावेत, असे आवाहन तहसीलदार, साक्री यांनी केले होते.
- आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता आगामी ग्रामपं चायत निवडणुकीच्या तयारीला तालुक्यात वेग येण्याची शक्यता आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






