
कुंभेफळ येथील दोन शेतकऱ्यांचा तातपुरते आत्मदहन स्थगित; परंडा तालुक्यात खळबळ, प्रशासनाची धावपळ
- प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :- परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथील पूरग्रस्त शेतकरी आसिफ इसाक शेख व इसाक चांद शेख यांनी आज, दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११:५५ वाजता कुंभेफळ शिवारात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
- राजकीय बळाचा वापर करून खोटे पंचनामे केल्याचा आ रोप झाल्यामुळे आणि त्यामुळे झालेल्या बदनामीमुळे सं तापून शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याचे जाहीर केले आहे.
- या इशाऱ्यामुळे परंडा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ सुरू झाली आहे.

- काय आहे नेमके प्रकरण?
सोनारी येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या पशुधन वि कास अधिकाऱ्यांनी १ जानेवारी, २०२६ रोजी तहसिलदा र परंडा यांना एक अहवाल सादर केला होता. - या अहवालात चांद शेख, गणेश भाऊ नायकोडे, ज्ञानेश्वर सुदाम कोटुळे, अतीक महंमद काझी, नज्जूपाशा चांदपा शा बेग, दासू किसन लक्ष्मण, नाथबा सरवदे, शब्बीर युनूस शेख आणि मुस्ताक सिद्दीक शेख यांनी राजकीय बळाचा वापर करून प्रशासकीय कर्मचाऱ्यांना वेठीस धरले, तसेच जनावरांचे खोटे पंचनामे व मृत्यू प्रमाणपत्र तयार करून घेतल्याचा खळबळजनक आरोप डॉक्टरने कडून करण्या त आला होता.
- तसेच या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची शासकीय मदत न देण्याची विनंती करत, त्यांच्या जनावरांच्या डिजिटल नोंदीं चा तपशील कारवाईसाठी पाच ते सहा दिवसात सादर करतो, असे अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले होते.

- पशुधन विकास अधिकाऱ्यांनी आरोप करूनही 8 महीने झाले तरी जनावरांच्या डिजिटल नोंदींचा कोणताही ठोस तपशील तहसिल कार्यालयाकडे सादर केला नाही.
- यामुळे आमची तालुक्यात नाहक बदनामी झाली असल्या चा आरोप अर्जदार आसिफ इसाक शेख व इसाक चांद शेख यांनी केला असून, उलट शासनाचा मयत जनावरांचा 1 रुपयाही भेटलेला नसताना गेल्या 01 वर्षभरापासून झा लेल्या बदनामीमुळे शेतकरी आसिफ इसाक शेख व इसा क चांद शेख यांनी आत्मदहनाचा पवित्रा घेत इशारा देण्या त आले होते.
- प्रशासनाच्या या दिरंगाईला कंटाळून आणि झालेल्या बद नामीच्या निषेधार्थ त्यांनी आज दिनांक 17 सप्टेंबर, 2026 रोजी रात्रीच थेट आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता.
- त्यानुसार प्रशासन आले ॲक्शन मोडमध्ये. शेतकऱ्यांच्या आत्मदहनाच्या या गंभीर इशाऱ्यानंतर वरिष्ठ पातळीवरून तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
- त्यानुसार तहसिलदार यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या स्वतः च्या व जनावरांच्या डिजिटल नोंदींचा तपशील तातडीने तहसिल कार्यालयाला सादर करण्याचे आदेश पशुधन विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
- जेणेकरून पुढील योग्य कार्यवाही करून अर्जदारांना शां त करता येईल.

- या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी (परंडा), पोलीस निरीक्षक (परंडा पोलीस ठाणे) यांना योग्य त्या तात्काळ कार्यवाहीसाठी व कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
- या गंभीर घटनेकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






