
पाचपिंपळा गावठाणसाठी नवीन डीपी मंजूर; आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नांना यश.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील पाचपिंपळा येथील गावठाण भागातील विजेच्या लपंडावा वर आणि कमी व्होल्टेजच्या समस्येवर अखेर कायमस्वरू पी तोडगा निघाला आहे.
- राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांच्या विशेष प्रयत्नातून पाचपिंपळा गावठाणसा ठी १०० KVA क्षमतेचा आणखी एक नवीन डीपी (DTC) मंजूर झाला आहे.
- महावितरणच्या धाराशिव विभागाच्या कार्यकारी अभियं ता कार्यालयाने २१ सप्टेंबर २०२६ रोजी या कामाला तां त्रिक मान्यता दिली आहे.

- ‘मंजुरी क्रमांक EE/DHRV/TS/DPDC NT/26-27/ 877’ नुसार या कामासाठी सुमारे ९ लाख ८२ हजार ४९ ६ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
- या विकासकामांतर्गत ०.६० किमी एचटी (HT) लाईन, १ ०० KVA चा नवीन ट्रान्सफॉर्मर आणि ०.३६ किमी एलटी (LT) लाईनचे काम युद्धपातळीवर करण्यात येणार आहे.
- हे सर्व काम ‘डीपीडीसी एनटी’ (DPDC NT) योजनेतून पूर्ण केले जाईल.
- पाचपिंपळा गावठाण, जुना पाचपिंपळा गावठाण व मौजे पाचपिंपळा परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसां पासून कमी व्होल्टेज आणि वारंवार खंडित होणाऱ्या वी ज पुरवठ्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
- हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नारायण खैरे सर, दिनकर आ बा खैरे आणि धनाजी खैरे यांनी आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
- ग्रामस्थांच्या या रास्त मागणीची तातडीने दखल घेत आम दार डॉ.सावंत यांनी अवघ्या एका दिवसात हा डीपी मंजूर करून आणला आणि आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला.
- आगामी काही दिवसांतच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून, नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होताच पाचपिंपळा परिसराचा विजेचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.
- आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या या तत्परतेबद्दल आणि खैरे यांच्या पाठपुराव्याबद्दल पाचपिंपळा ग्रामस्थां मधून मोठे समाधान व्यक्त होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






