बामणोलीची सन्मिता जाधव बनली डॉक्टर (BAMS) गावासह मार्लेश्वर पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद कामगिरी.

  • प्रतीनिधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मा र्लेश्वर पंचक्रोशीतील बामणोली गावातील उगवतीवाडीच्या कन्या आणि सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या कुमा री सन्मिता संजना संजय जाधव यांनी BAMS (Bache lor of Ayurvedic Medicine and Surgery) ही वै द्यकीय पदवी यशस्वीरीत्या प्राप्त केली आहे.
  • कु.सन्मिता संजना संजय जाधव या श्री. राजाराम रामचंद्र जाधव यांच्या नात असून, आपल्या मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी वैद्यकीय क्षे त्रात हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
  • ग्रामीण भागातील आपल्या मुळांशी असलेले नाते जपत मुंबईत वास्तव्यास असताना वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्रा प्त करून सन्मिता यांनी बामणोली गावासह संपूर्ण मार्ले श्वर पंचक्रोशीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
  • सन्मिता यांच्या वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांचे काका श्री.शांताराम सखाराम माईन यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि पाठबळ अत्यंत मोलाचे ठरले.
  • सन्मिता यांच्या वैद्यकीय शिक्षणाच्या वाटचालीचे आणि त्यांना या क्षेत्रात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे श्रेय त्यांच्या काकांना जाते.
  • त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ तसेच मार्लेश्वर पंचक्रोशीतील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनं दनाचा वर्षाव होत आहे.
  • सन्मिता यांच्या या यशामुळे बामणोली गावातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि नव्या पिढीला शिक्षणा च्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण कर ण्याची निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
  • कुमारी सन्मिता संजना संजय जाधव यांना BAMS पद वी प्राप्त केल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…!
  • वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. !
  • त्यांच्या हातून समाजाची आणि गरजू रुग्णांची मनोभावे सेवा घडो, हीच सदिच्छा. बामणोली गावासाठी आणि मा र्लेश्वर पंचक्रोशीसाठी ही निश्चितच अभिमानाची आणि आ नंदाची बाब आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles