मार्ग ताम्हाणे गावचे सुपुत्र,मालाड येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुकाराम पवार यांचे निधन.

  • प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- मालाड (पूर्व) आनंद वाडी येथील रहिवाशी, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सती श तुकाराम पवार यांचे दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले.
  • मालाड पूर्व कुरार मध्ये डॅनी नावाने घरोघरी ते परिचित होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी अंजली सतीश पवार, मुलगा अथर्व सतीश पवार असा परिवार आहे.
  • स्मृतीशेष सतीश पवार यांचे मूळ गाव मौजे मार्ग ताम्हाणे, तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी हे आहे तर बौद्धजना पंचायत समिती शाखा क्र. ४२३ चे सक्रिय सभासद होते.
  • मालाड पूर्ण मधील एका नामांकित अक्षता कॅटरिंग मध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. सतीश पवार यांचा स्वभाव मनमिळाऊ, प्रेमळ होता.
  • सामाजिक कार्यक्रमात त्यांचा मोठा सहभाग होता.त्यांच्या निधनामुळे शाखा क्र ४२३ चे भरून न येणारे नुकसान झाले आहे. असे शाखेचे अध्यक्ष पत्रकार चंद्रशेखर जाधव यांनी सांगितले.
  • मधील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, मालाड समता संवर्धन समिती आदी संस्था संघटनांनी कालकथित सतीश पवार यांच्या निधनामुळे दुःख व्यक्त केले आहे.
  • जलदान व पुण्यानुमोदन त्यांच्या आनंदवाडीतील राहत्या घरी रविवार दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles