कंडारी येथील मंदिरांमधील धाडसी चोरीला आठ दिवस उलटूनही पोलिसांना चोरांचा सुगावा लागलेला नाही.

  • प्रतिनीधी : फारूख शेख :- कंडारी गावात आठ दिवसां पूर्वी मंदिरांचे कुलूप तोडून मौल्यवान ऐवज चोरीला गेला होता. पवित्र धार्मिक स्थळांवर झालेल्या या चोऱ्यांमुळे सं पूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  • मात्र, घटना घडून आठवडा उलटला तरी पोलीस प्रशासना ला चोरांचा कोणताही माग काढता आलेला नाही.
  • FIR दाखल करण्यास दिरंगाई केल्याचा ग्रामस्थांचा आरोप
  • ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करून घेण्या स कमालीची दिरंगाई केली.
  • पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळे चोरांना पळून जाण्यास मोकळे रान मिळाले, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.
  • कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यां वर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी माग णी आता जोर धरू लागली आहे.
  • गावात निषेध रॅली; भव्य आंदोलनाचा इशारा
  • पोलिसांच्या संथ कारभाराचा निषेध करण्यासाठी आज कंडारी ग्रामस्थांनी एकत्र येत गावातून भव्य रॅली काढली. ‘चोरांना तात्काळ अटक करा’ अशा घोषणा देत नागरिकां नी पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध केला.
  • ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर पुढील काही दिवसांत चोरीचा तपास लावून चोरांना गजाआड केले नाही,तर संपूर्ण कंडारी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरू पाचे रास्ता रोको आणि सामूहिक आंदोलन छेडण्यात येईल.
  • या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी पोलीस आणि स्थानि क प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
  • या रॅलीत कंडारी गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला आ णि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आता पो लीस प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles