संत मीरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य संतोष भांडवलकर यांना ‘स्टार एज्युकेशन २०२६’चा बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-शिक्षण क्षेत्रात उल्ले खनीय कार्य करत शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वां गीण विकास, शिस्त, संस्कार तसेच विविध शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देणारे संत मीरा पब्लिक स्कूल, परंडाचे प्राचार्य संतोष सोपान भांडवलकर यांना प्रतिष्ठेचा ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स-२०२६’ प्रदान करण्यात आला.
  • ‘बेस्ट प्रिन्सिपल – स्टेट बोर्ड, धाराशिव’ या श्रेणीत त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
  • मुंबई येथील NESCO, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव पूर्व येथे ६ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात प्राचार्य संतोष भांडव लकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
  • Education Supply & Franchise Expo 2026 अं तर्गत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला शिक्ष ण क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
  • ESFEच्या सहकार्याने आणि The Times of Indiaच्या सहयोगाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • प्राचार्य संतोष भांडवलकर यांनी संत मीरा पब्लिक स्कूल च्या शैक्षणिक वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
  • विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांच्यामध्ये शिस्त व संस्कार रुजावेत तसेच अभ्यासाबरोबरच क्रीडा, कला आणि इतर उपक्रमांमध्ये त्यांना संधी मिळावी, यासा ठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
  • त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने विविध शैक्षणिक आणि क्री डा क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे.
  • त्यांच्या या शैक्षणिक कार्याची, नेतृत्वगुणांची आणि विद्या र्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या योगदानाची दखल घेत Serial No. B-36 अंतर्गत ‘बेस्ट प्रिन्सिपल – स्टेट बोर्ड, धाराशिव’ या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.
  • पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य संतोष भांडवलकर यांच्या सोबत बालाजी गोरे आणि अशोक राठोड उपस्थित होते.
  • मुंबईतील भव्य कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारण्याचा हा क्षण संत मीरा पब्लिक स्कूलसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा ठरला.
  • पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्राचार्य संतोष भांडवलकर यांनी संस्थाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटी ल, संचालक डॉ.शिल्पा पाटील, करण पाटील, कुटुंबीय, स र्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानले.
  • सर्वांगीण आणि गुणवत्तापूर्ण विकासासाठी यापुढेही अधि क उत्साहाने व जबाबदारीने काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
  • दरम्यान, प्राचार्य संतोष भांडवलकर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संत मीरा पब्लिक स्कूलचे अध्यक्ष डॉ. प्रता पसिंह पाटील, संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्म चारी, विद्यार्थी आणि पालकांनी त्यांचे अभिनंदन केले.
  • त्यांच्या या यशामुळे परंडा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रा च्या लौकिकात भर पडली असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles