
कंडारी येथील मंदिर चोरी प्रकरण: पोलीस तपासात अपयश आणि दिशाभूल केल्याचा आरोप; API अर्जुन चौधर व PSI होडशीळ यांच्या निलंबनाची व CDR चौकशीची माहिती अधिकार कार्यकर्त्यांची मागणी.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- कंडारी येथील प्रसि द्ध मंदिरातील चोरी प्रकरणाचा तपास लावण्यात आलेले अपयश, एफआयआर (FIR) दाखल करण्यात झालेला कमालीचा विलंब आणि नागरिकांसह भाविकांची चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी आंबी पोलीस ठा ण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अर्जुन चौधर आणि बीट अंमलदार पोलीस उपनिरीक्षक (PSI) होडशी ळ यांच्या चौकशीची व निलंबनाची मागणी करण्यात आली.
- या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमं त्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि तह सीलदार यांना लेखी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

- मशीन खराब असल्याचे सांगत दिशाभूल…. ?
- मिळालेल्या माहितीनुसार, कंडारी मंदिर चोरीप्रकरणी गु न्हा दाखल करण्यास विलंब का झाला, असे विचारले अ सता API अर्जुन चौधर यांनी “एफआयआर नोंदवण्याची मशीन खराब असल्यामुळे दिनांक ३० सप्टेंबर ते ३ ऑ क्टोबर दरम्यान कोणतीही एफआयआर फाडली (नोंदव ली) गेली नाही,” असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, या दा व्यातील फोलपणा आता समोर आला आहे.
- ग्रामस्थांचा संशय; पांढरेवाडीच्या दि 2/10/2026 रोजि एफ.आय.आर.मुळे पोलखोल
- माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी निवेदनात आक्षेप घेतला आहे की, जर ३० ते ३ तारीख दरम्यान मशीन खरोखरच खराब होती, तर दिनांक २ ऑक्टोबर रोजी पांढरेवाडी ये थील एफआयआर कशी काय नोंदवण्यात आली….?
- मशीन खराब असतानाही ती एफआयआर कोणी आणि कशी फाडली? ती एफआयआर दाखल करून घेण्यासा ठी अंबी पोलिसांवर कोणाचा राजकीय किंवा वरीष्ठांचा दबाव होता का? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
- सीडीआर (CDR) चौकशीची मागणी
- या संपूर्ण प्रकारामुळे API चौधर आणि PSI होडशीळ यांच्या भूमिकेविषयी कंडारी ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये तीव्र संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- या अधिकाऱ्यांनी कोणाला पाठीशी घालण्यासाठी ही दिशाभूल केली, याचा शोध घेण्यासाठी या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) चौकशी कर ण्यात यावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
- आंदोलनाचा पवित्रा
- “पोलीस प्रशासनाने तातडीने या प्रकरणातील सत्य काय आहे ते ग्रामस्थ आणि आंदोलकांसमोर आणावे.
- कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि जनतेची दिशाभूल कर णाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करावे, अन्य था तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
- या निवेदनावर फारुक शेख विजय मेहर जमीर शिकलकर सादिक शेख शिवाजी करळे आसिफ शेख मुस्ताक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या प्रकरणावर आता पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






