
कोठारेच्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात इस्क्रा फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम; चार दिवसीय कार्यक्रम उत्साहात संपन्न.
- प्रतिनीधी : हिराजी देसले :- “इस्क्रा जाणीवांची, दिशा नवनिर्माणाची” या ध्येयविचारातून इस्क्रा फाउंडेशन शिक्ष ण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विका साच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहे.
- नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ उपल ब्ध करून देणे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि समाजातील एकोपा वृद्धिंगत करणे हा या उपक्रमांचा मु ख्य उद्देश असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र देसले यांनी दिली.
सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, कोठारे यांच्या वतीने आ योजित नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इस्क्रा फाउंडेशन च्या टीमने १७ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध मनोरंजनात्मक, सांस्कृतिक आणि संस्थात्मक उपक्रमांचे आयोजन केले.- मंडळाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि फाउंडेशनच्या टी मला मिळालेल्या सहकार्यामुळे सर्व कार्यक्रम यशस्वीरी त्या पार पडल्याचे फाउंडेशनचे डायरेक्टर व संस्थापक चेतन कांबळे यांनी सांगितले.
- १७ ऑक्टोबर रोजी इस्क्रा फाउंडेशनतर्फे ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

- यामध्ये फुगा च्या सहाय्याने कागदी क्लास उचलने.बिस्कि ट खाण्याची स्पर्धा, चेहऱ्यावरून स्टिकी नोट्स काढणे आणि पिठातून नोट शोधणे अशा विविध मनोरंजक स्पर्धा घेण्यात आल्या.
- महिलांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला ह्याची माहिती फाउंडेशन चे सचिव प्रगती कांबळे ह्यांनी दिली.
- साक्षी लखांबरे ,स्वप्नाली देसले , मोनिका देसले ,मालती ताई या चार स्पर्धेकांनी अंतिम फेरीत भाग घेतला आणि त्यापैकी साक्षी नितीन लखांबरे यांनी प्रथम क्रमांक पटक वून पैठणी जिंकण्याचा मान मिळवला.
- दुबईहून आलेले इंजिनिअर सुजित वेखंडे यांच्या हस्ते पैठ णी प्रदान करण्यात आली.
- विजेत्यांना पैठणी व विविध बक्षिसे देऊन गौरविण्यात आ ले, अशी माहिती फाउंडेशन चे सह सचिव अस्मिता कहा ळे ह्यांनी दिली.
- १८ ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन क रण्यात आले. या कार्यक्रमात करण देसले, तन्मय देसले, यश देसले, अंश देसले, अस्मिता कहाळे, कुणाल देसले, कार्तिक जाधव,केतकी देसले, जयश्री देसले, हिंदवी लखां बरे आणि यज्ञा लखांबरे यांनी आपल्या कलागुणांचे साद रीकरण केले.

- सहभागी स्पर्धकांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मि ळाला त्याचबरोबर १९ ऑक्टोबर रोजी इस्क्रा फाउंडेशन चा पदवाटप सोहळा पार पडला.
- या सोहळ्याच्या माध्यमातून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदांची आणि जबाबदाऱ्यांची औपचारिक ओळ ख करून देण्यात आली, अशी माहिती फाउंडेशनचे ॲड मिन व ठाणे विभागप्रमुख अक्षय लखांबरे यांनी दिली.
- २० ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झा लेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
- सहभागींच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या स हभागाचे कौतुक करणे हा या उपक्रमामागील उद्देश होता, अशी माहिती फाउंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापिका श्वेता पाटील यांनी दिली.
- या चार दिवसीय कार्यक्रमांच्या आयोजनासाठी हरिश्चंद्र दे सले, कौस्तुभ जोगळेकर आणि सुजित वेखंडे यांनी आर्थि क योगदान दिले.
- तसेच उर्वरित खर्चासाठी इस्क्रा फाउंडेशनच्या टीममधील सर्व सदस्यांनी आपापल्या परीने आर्थिक हातभार लावला , अशी माहिती सोशल मीडिया व्यवस्थापक अर्पिता पिळ णकर यांनी दिली.
- या कार्यक्रमांना फाउंडेशनचे सर्जनशील विभाग सहाय्यक महेश सोनावणे, सहसंघटक गीता लखांबरे आणि जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन ब नसोडे यांच्यासह योगेश देसले, हिराजी देसले आणि विशा ल देसले तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

- सर्वांच्या सहकार्यामुळे चार दिवसीय नवरात्रोत्सवातील उपक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला अशी माहिती फाउंडेशन चे शहापूर तालुका संघटक भूषण देस ले ह्यांनी मत व्यक्त केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






