
कुर्णे येथे २२ एप्रिल पासून श्री राधाकृष्ण मंदिर जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा.
- प्रतिनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौजे कुर्णे मधली पडये येथे श्री राधाकृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवार दि २२ ते २५ एप्रिल २०२६ या चार दिवसाच्या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत आहे.
- बुधवार २२ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. कलश मिरवणूक, दु. २ ते ३ महाप्रसाद, सायं ७ वा. विविध स्पर्धा गुरुवार दि.२३ रोजी स. ९ वा.संकल्प पुजा, गणेश पुजन, पुण्य हवन, देवता आवाहन श्री राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य विधीला सुरुवात होईल दु. २ ते ३ महाप्रसाद, सायं ७ विविध स्पर्धा, सायं ८ वा. गुरव भजन मंडळ मानेवाडी कुर्णे यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

- दि. २४ रोजी होम – हवन, अभिषेक, श्री राधाकृष्ण मूर्ती स्थापना, तत्वन्यास, श्री राधाकृष्णाची महापूजा, कलशारो पण, धवजारोहन दु. २ वा महाप्रसाद आणि रात्री १० वा श्री राधाकृष्ण नमन मंडळ,मधली पडये वाडी यांच्या बहु रंगी नमनाचा कार्यक्रम होणार आहे.
- शनिवार दि.२५ एप्रिल रोजी सायं ३ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायं ५ वा हळदीकुंकू समारंभ, सायं ७ वा महा प्रसाद, रात्री ९ वा. बक्षीस वितरण कार्यक्रम व पाहुण्यांचे स्वागत तसेच १०.३० वा. श्री विराट विश्वकर्मा नाट्य नमन मंडळ, संगमेश्वर यांच्या नमनाचा कार्यक्रम होणार आहे.
- पंचक्रोशीतील सर्व भक्त भाविकांनी मंदिर जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
- असे आवाहन आयोजक श्री राधाकृष्ण मंदिर समिती, कु र्णे, श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान (रजि.) मुंबई व सहसमिती मुंबई – पुणे व कुर्णे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






